Vasuri Agro
गोपनीयता धोरण
ही वेबसाइट शक्य तितकी कमी माहिती गोळा करते. खाली नेमकं काय गोळा होतं आणि त्याचं काय होतं ते दिलं आहे.
शेवटचा बदल: १९ सप्टेंबर २०२६
आम्ही काय गोळा करतो
तुम्ही चौकशी फॉर्म भरला किंवा आम्हाला व्हॉट्सअॅप केलं तरच आम्हाला तुमची माहिती मिळते — नाव, फोन नंबर, तुम्ही दिलेला ईमेल, आणि तुम्ही लिहिलेला संदेश.
ही वेबसाइट जाहिरातींच्या कुकीज वापरत नाही आणि तुम्हाला इतर संकेतस्थळांवर ट्रॅक करत नाही.
आम्ही ती कशासाठी वापरतो
फक्त तुमच्या चौकशीला उत्तर देण्यासाठी आणि तुमची भेट किंवा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी.
आम्ही तुमची माहिती विकत नाही, भाड्याने देत नाही किंवा जाहिरातदारांना देत नाही.
आम्ही ती किती काळ ठेवतो
तुमच्या चौकशीचा किंवा ऑर्डरचा व्यवहार पूर्ण होईपर्यंत, आणि त्यानंतर आमच्या नोंदींसाठी वाजवी काळ.
तुमची माहिती हटवावी असं वाटत असल्यास आम्हाला फोन करा किंवा ईमेल करा. आम्ही ती हटवू.
तुमचे हक्क
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम, २०२३ अंतर्गत तुम्हाला आमच्याकडे असलेली तुमची माहिती मागण्याचा, ती दुरुस्त करून घेण्याचा आणि हटवण्याचा हक्क आहे.
यासाठी contact@vasuriagro.com वर संपर्क साधा किंवा +91 73783 49454 वर फोन करा.
संपर्क
Vasuri Agro Tourism & Natural Products
गट नं. १३३, मु. राजुरा पोस्ट, तुरकाबाद, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
+91 73783 49454
contact@vasuriagro.com
